मुंबई (प्रतिनिधी) : बोरिवली विभागातील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रमोद शिंदे यांचे चिरंजीव कुमार संजर शिंदे याची युरोपमधील जर्मनीतील बाल सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड झाली आहे. संजर शिंदे यांच्या निवडीबद्दल या भागात प्रचंड प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत असून अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुलूपवाडी, बोरिवली (पूर्व) या मंडळाच्या वतीने कुमार संजर शिंदे याचा संस्थेच्या वतीने गौरव करून त्यास पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतातून पाच मुलांची निवड झालेली आहे. कुमार संजर शिंदे याचा सत्कार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, सिनेट सदस्य मिलिंद साटम तसेच शाखा समन्वयक योगेश देसाई हे उपस्थित होते. संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कुमार संजर शिंदे यास भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुलूपवाडी बोरिवली पूर्व या मंडळाचे पदाधिकारी राजू गीते यांनी केले.
