Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रशिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हांबाबत पुन्हा तारीख-पे तारीख

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हांबाबत पुन्हा तारीख-पे तारीख


प्रतिनिधी : १७ सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर २१ ऑक्टोबरला आता सुनावणी होईल. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले नसले तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत.
या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे.
यापूर्वी सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही सुनावणी आज होणार असल्याचे समोर आले होते.
पण आता सुनावणी लांबणीवर पडली आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. आता सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला आता सुनावणी होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी आता न्यायालयाची मदत घेतली जाते का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तरी निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले.
आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोचले. त्याच्यामुळे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातला शंका काल घट्ट झाल्या. पक्क्या झाल्या असा जोरदार हल्ला त्यांनी केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments