प्रतिनिधी : वहागांव गावचे सरपंच संग्राम पवार बाबा यांनी त्यांच्या मित्र परिवार व ग्रामस्थ यांचा माध्यमातून तीर्थक्षेत्र यात्रेचे नियोजन केले होते यामध्ये वहागांव व पंचक्रोशी मधील तब्बल १७० लोकं श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी २ सप्टेंबर ला उत्तरभारतातील अयोध्या – काशी -प्रयागराज येथे देवदर्शनाला गेले होते. ही तीर्थयात्रा सहल सोमवारी ९ सप्टेंबर रोजी गावी परतली
यामध्ये साठ वर्षावरील महिला व पुरुष यांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता.
माणसाने आयुष्यात येऊन एकदा तरी काशी दर्शनाला जावे अशी वयोवृद्ध प्रत्येकाची इच्छा असते ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होते
वहागाव ते पुणे,पुणे ते अयोध्या २ सप्टेंबर ला रेल्वे ने निघालेली सहल ०४ सप्टेंबर बनारस येथे पोहचल्यानंतर गंगास्नान करून काशी विश्वनाथाचे दर्शन, संकट मोचन हनुमान दर्शन घेऊन सहल पुढे अयोध्येला रवाना झाली. अयोध्यामध्ये शरयू स्नान करून हनुमान गढी, सुगरीव किल्ला, व प्रभू श्रीरामाच्या नुकत्याच उभारलेल्या नवीन मंदिरात राम लल्लाच्या मूर्तिचे दर्शन घेऊन सहल पुढे प्रयागराज ला रवाना झाली
प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती नदिंचा संगम पाहून त्यामध्ये स्नान करून दर्शन घेऊन लोकांनी एक वेगळा अनुभव या सहलीचा माध्यमातून घेतला.तब्ब्ल एक आठवडा प्रवास करून सर्वजण ९ सप्टेंबर रोजी वहागांव येथे सुखरूप समाधानाने पोहचले
. गावातील एकाच वेळी एवढी माणसे देवदर्शनाला जाऊन आल्यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेतहा जेष्ठ लोकांचा सहभाग या तीर्थयात्रेत मोठ्या प्रमाणवार होता.
वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्याच्या प्रवासात स्वयंसेवक म्हणून स्वतः संग्राम पवार, संतोष फौजी, संपत पैलवान, जयेश पवार नाना, मोहन पवार, फोटोग्राफर सुरेश पवार, शंकर डॉक्टर, कांता आबा, विकास पवार, जगदीप जमदाडे, विश्वजित पाटील, गणेश देशमुख, राहुल वायदंडे, सचिन शेवाळे, गिरीधर कदम यांनी मोलाचे सहकार्य केले

चौकट
जरवर्षी कुटुंबातील व जवळचा काही लोकांचा समवेत आम्ही सहलीचे आयोजन करत असतो परंतु यावर्षी रामजन्मभूमी आयोध्या व काशी दर्शन करावे असे ठरवले लोकांनी या यात्रेत चांगला प्रतिसाद दिला. सर्व यात्रेकरू हे स्वखर्चाने या यात्रेत सहभागी झाले होते.या सहलीत लोकांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचे एक वेगळे समाधान मनात आहे
संग्राम पवार (बाबा)
सरपंच ग्रामपंचायत वहागांव