Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्ररक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन...

रक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना मदत करावी- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार

ठाणे : सध्या ठाणे शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून तसेच गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी केले आहे.
ही रक्तदान मोहीम आज बुधवार, दि.11 सप्टेंबर 2024 रोजी पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे सुरु करण्यात आली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत दररोज सुरू राहणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments