
प्रतिनिधी(प्रताप भणगे) : कराड संभाजी भाजी मार्केट परिसरामध्ये राहत असलेले फासेपारधी हटवण्यासाठी आपलं कराड ग्रूप तर्फे काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्याची पोलिस प्रशासनाने तत्काळ दाखल घेऊन मार्केट परिसर फासेपारधी मुक्त केले त्याबद्दल आपलं कराड ग्रूप तर्फे पोलिस प्रशासन आणि त्यांच्या टीम चे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी आपलं कराड ग्रुप मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.