मुंबई(रमेश औताडे) : दलित पँथर या संघटनेची पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी १९७२ साली स्थापन केली होती. त्यांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर त्यांच्या पत्नी मल्लिका यांच्याकडे संघटनेची जबाबदारी होती. त्यांनी आता त्यांच्या आजारपणामुळे संघटनेची अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे पुतणे डॉ. स्वप्नील ढसाळ यांच्याकडे त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नवनिर्वाचित युवा अध्यक्ष डॉक्टर स्वप्रिल ढसाळ हे नामदेव ढसाळ यांचे पुतणे आहेतच पण नामदेवची ध्येयधोरण ही त्यांना माहित आहेत आणि आमची नवी फळी नव्या जोमाने पुन्हा मैदानात उत्तरत आहे . रोजगार योजना, महीला अत्याचार, उद्योग, जेष्ठ नागरिक, तरुण, शेतकरी असे सर्व घटक आज दुर्लक्षित आहेत. त्यांच्याकडे संघटना नव्या जोमाने सामोरे जाऊन लढा देणार आहे असे डॉ. स्वप्रिल ढसाळ यांनी सांगितले.