सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात निसर्गाने विपुल वरदान दिलेले आहे. परंतु, मानवी अतिक्रमण व सिमेंटचे जंगल उभे करण्याची स्पर्धा लागलेली आहे. याला जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस यंत्रणा ही तेवढीच जबाबदार आहे. हे आता लपून राहिलेले नाही. सध्या कायद्याचे पालन करा. हे सांगण्यासाठी प्रामाणिक व लोकशाहीची काळजी असणारे संघटना व लोक आंदोलन करतात. त्यानंतर त्याची चौकशी करतो. व कारवाई करतो. असे सांगितले जाते. म्हणजे आम्ही जबाबदारीचे पालन करतो.पण चौकशी झाल्यानंतरच असाच सुरू आहे. अशा वेळेला साताऱ्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना परिसरात इंद्रधनु पाहून अनेकांना निसर्गाची किमया पहण्यास मिळाली. साताऱ्यातील आलेवाडी तालुका जावळी येथील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार शहाजी गुजर हे आपल्या नित्य कामांमध्ये व्यस्त असताना सुद्धा त्यांनीही निसर्गाची किमया आपल्या कॅमेरामध्ये टिपले आहे. त्यामुळे सातारकरांना आता वृत्तपत्रातही इंद्रधनु पाण्यास मिळणार आहे. त्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
