प्रतिनिधी : वृक्ष, प्राणी,पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करुन त्यांचे रक्षण राखू निसर्गाची शान..! वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे..! निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे ,त्या निसर्गाचे आपण काहितरी देण लागतो याचे भान ठेऊन वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले.उंडाळे,कराड येथील आझाद गणेश मंडळाचे रौप्य महोत्सव वर्ष या निम्मिताचे औचित्य साधून गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ८ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण व स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली. यावेळी सर्व मंडळातील सदस्य उपस्थित होते. यावर्षी सुद्धा मंडळाने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत,त्यापैकी शालेय गरजू विद्यार्थ्यांना साहित्य व कपडे वाटप (मंगळवारी सकाळी १० वाजता), धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचेबद्दल व्याख्यान (मंगळवारी १० सप्टेंबर रात्री ९ वाजता ), विधवा माहिलांसाठी हळदी कुंकू, समाज प्रबोधनासाठी मनोरजनात्मक कार्यक्रम, भारतीय सैन्यदलातील जवानांचा सन्मान, गौरी सजावट स्पर्धा (बुधवार दि ११ रोजी), मराठी चित्रपट आयोजन (गुरुवारी रात्री ९ वाजता ), आरोग्य शिबिर (शनिवारी १४ रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यत),रक्तदान शिबिर (१५ सप्टेंबर रविवार सकाळी ९ ते १ वाजेपर्यत) प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. श्री च्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक असे भरगच्च सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन आझाद गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राबिवण्यात येणार आहेत.या संधीचा सर्व गणेश भक्तासह,नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
