Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रखारघर,नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केमो डे केअर वॉर्ड सुरू; केमोथेरपी करून    ...

खारघर,नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केमो डे केअर वॉर्ड सुरू; केमोथेरपी करून     रुग्ण घरी जाऊ शकतो – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे

नवी मुंबई :  कॅन्सरशी लढा देणात्यांसाठी तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी नवी मुंबईच्या वारपर येथील मेडिकबर हॉस्पिटल्सने सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केमो डे केजर बॉर्ड सुरु केला आहे. या नवीन सुविधेमध्ये एकाच वेळी 15 रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकतात आणि त्यात अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी उपचार दिले जाणार आहेत मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी कक्षाचे प्रमुख थी मंगेश चिवटे यांच्या हस्ते वा प्रभागाचे उद्घाटन करण्यात आले

केमोथेरपी हा कर्करोगाच्या उपचाराचा आधारस्तंभ आहे. बहुसंख्य रुग्णांसाठी, हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेणे आणि त्यानंतर घरी परतणे हा प्रवास खूप त्रासदायक ठरतो. या प्रक्रियेमुळे त्यांना अनेकदा चकल्यासारखे वाटते. म्हणूनच, नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सने रुग्णांना केमोथेरपी उपचार घेण्यासाठी आणि त्याच दिवशी घरी परतण्यासाठी केमो डे केअर बॉर्डची स्थापना करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

मेडिकवर हॉस्पिटल्सच्या माध्यमातून हे आतापर्यंत कर्करुग्णांना आजतगायत उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी रुग्णालयाने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे. रुग्णालयाने घेतलेल्या प्रयवांमुळे कर्करोगाच्या रूग्णावर उच्च दर्जाचे व यशस्वी उपचार केले जातील अशी प्रतिक्रिया श्री मंगेश चिवटे मुख्यमंत्री वैदयकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख) यांनी यावेळी व्यक्त केली.

नवीन डे केअर बॉर्ड हे कर्करोगाच्या रुग्णांसाठी उपचार पद्धती बदलत आहे. हा वॉर्ड रुग्णांसाठी सोयी आणि जाराम या दोन्ही गोष्टीना प्राधान्य देतो. केमोथेरेपी घेतल्यानंतर त्याच दिवशी ते घरी जाऊ शकतात है रुग्णांना दिलासा देणारे आहे. वॉर्ड रुग्णांना आणि त्यांच्या प्रियजनांना केमोथेरपी-संबंधित दुष्परिणामांना प्रतिबंध आणि व्यवस्थापनाबाबत शिक्षित करेल. हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रमाणापेक्षा जास्त केस गळत असणाऱ्या रुग्णांना केमो कॅप्स दिल्या जातील अशी प्रतिक्रिया डॉ डोनाल्ड जॉन बाबू। सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकबर हॉस्पिटल, नवी मुंबई) यांनी व्यक्त केली.

मेडिकवर हॉस्पिटलचे प्रयत्र हे केवळ रोगावर उपचार करण्यासाठीच नव्हे तर, या आव्हानात्मक काळात रुग्णांना होणारा त्रास, त्यांची गैरसोय कमी करण्याचा देखील प्रयव केला जात असल्याचे डॉ. माताप्रसाद गुप्ता ( मेडिकवर हॉस्पिटल्सचे, केंद्र प्रमुख) यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments