भोसे : राज्यातल्या फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळावं. फुटबॉलमध्ये रुची असणाऱ्या त्या प्रत्येक युवकांना पुढे येऊन खेळण्याची संधी मिळावी. यासाठी पाचगणीच्या संजीवन विद्यायाच्या वतीने स्व. श्री. शरद पंडीत फुटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यामध्ये फुटबॉलशी संबंधित असलेल्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या संधीचं सोनं करावं असे आवहान संजीवन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे. ही स्पर्धा २४ आणि २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी दोन दिवस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व संघाची उपस्थिती २३ ऑक्टोबर २०२४ ला असणार आहे. संजीवनी विद्यालय पाचगणी ता. महाबळेश्वर जि. सातारा या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ वर्षाखालील मुलांचा संघ या फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो. प्रवेश नोंदणीची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२४ आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या १६ पहिल्या संघांना येथे संधी देण्यात येणार आहे. फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारी संजीवन विद्यालय ही पाचगणीची शाळा या स्पर्धेमुळे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आसपासचे अनेक संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आयोजक श्री. सचिन कांबळे 9860164066/ 9011013988 ईमेल आयडी: sanjeewansport@gmail.com यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संजीवन विद्यालयाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही फुटबॉलची परंपरा चालवतो. खूप मोठ्या, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आमची मुलं सहभागी होतात. आमच्याकडे जे संघ खेळतात, ते यश संपादन करतात, त्यांनाही सगळीकडे मोठ्या संधी उपलब्ध होतात. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातले अनेक संघ पाचगणी सारख्या ठिकाणी येतील. त्यांच्या खेळाचं प्रदर्शन करतील. मला आशा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून फुटबॉल संदर्भातले वातावरण अजून क्रीडामय होईल. अनेक खेळाडूंना पुढे जाण्यासाठी यातून संधी मिळेल. अशी माहिती क्रीडाशिक्षक तथा आयोजक सचिन कांबळे यांनी दिली आहे.
सोबत लोगो आणि फोटो आहेत
