Tuesday, April 30, 2024
घरमहाराष्ट्रसेलिब्रिटींनी सांचीच्या ‘पुस्तकांचं झाड’ उपक्रमाला लावले ‘चार चाॅंद’

सेलिब्रिटींनी सांचीच्या ‘पुस्तकांचं झाड’ उपक्रमाला लावले ‘चार चाॅंद’

कराड प्रतिनिधी : डाकवे परिवाराच्या वतीने वाचनसंस्कृतीला प्रेरणा आणि बळ देण्यासाठी राबवलेल्या ‘पुस्तकांचं झाड’ या उपक्रमाला सांचीच्या चिमुरडया मित्रांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी वाढदिवसानिमित्त सांचीला खेळण्यासोबतच पुस्तके भेट देवून या उपक्रमाची उंची वाढवली तर मराठी सिनेसृष्टीतील मान्यवर सेलिब्रिटींनी शुभेच्छा देत या उपक्रमाला ‘चार चाॅंद’ लावले. प्रा.अधिकराव कणसे यांनी ज्ञानेश्वरी सोबत अन्य संस्कारक्षम ग्रंथ देवून या उपक्रमाचा शुभारंभ केला तर नितीन कुराडे परिवाराच्या वतीने मुळाक्षरे, अंक, प्राणी, पक्षी, वाहने, वृक्ष यांची आकर्षक रंगीत चित्रे असणारी पुस्तके प्रदान केली.
प्रारंभी सुप्रसिध्द कॅलिग्राफी आर्टीस्ट बाळासाहेब कचरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुस्तकांचं झाड’ च्या लोगोचे अनावरण केले. स्पंदन डाकवे, अथर्व भालेकर, तीर्था कणसे, ओवी पोळ, सौरभ नलवडे, शिवन्या बनसोडे, सारांश पाटील या चिमुकल्या मुलांनी पुस्तके हातात घेवून आपला आनंद व्यक्त केला. डेकोरेशनसाठी फुग्यांसोबत सुप्रसिध्द मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छपाई असलेल्या पताका लावल्या होत्या. या पताका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
‘पुस्तकांचं झाड’ या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी प्रा.ए.बी.कणसे, डाॅ.प्रा.नागेश बनसोडे, डॉ.संदीप डाकवे, गुलाब जाधव, भरत डाकवे, नितीन कुराडे, नेहा कुराडे, पुनम जाधव, हिराबाई येळवे, गयाबाई डाकवे, रत्ना काळे, ज्योती पाटील, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, शीतल बनसोडे, रेश्मा डाकवे, सौ.माने, स्वरुप कुराडे, अभिजीत जाधव, क्षितीज जाधव, प्रथमेश डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत डाकवे परिवार आपल्या घरात वाचनासाठी विनामुल्य पुस्तके ठेवणार आहे. झाडे ज्याप्रमाणे आपणांस ऑक्सीजन, पाने, फळे आणि फुले देतात. त्याच पध्दतीने ‘पुस्तकांचं झाड’ मधील पुस्तके ज्ञान, माहिती आणि मनोरंजन हे देणार आहेत. अशी या उपक्रमाची साधी संकल्पना आहे. पुस्तकांच्या नोंदी, देवाणघेवाणीसाठी रजिस्टर तसेच उपक्रमाबाबतच्या सुचनांसाठी अभिप्राय वही देखील ठेवली आहे.

दरम्यान, यापूर्वी डाकवे परिवाराने सांचीच्या बारशानिमित्त महिलांचा नारी रत्न पुरस्काराने सन्मान, बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार असे विधायक उपक्रम राबवले आहेत.

चौकट : सेलिब्रिटी मान्यवरांकडून शुभेच्छा:
‘पुस्तकांचं झाड’ या अनोख्या संकल्पनेला सुप्रसिध्द अभिनेते अविनाश नारकर, अभिनेत्री वर्षा दांदळे, अभिनेता आकाश पाटील, अभिनेत्री सुनंदा शेंडे, ह.भ.प.संगिताताई येनपुरे यांनी व्हीडीओ क्लीप शेअर करत शुभेच्छा देवून उपक्रमाचे कौतुक केले. या शुभेच्छांनी उपक्रमाला ‘चार चाॅंद’ लागले. शिवाय डाकवे परिवारासह उपस्थित सदस्य भारावून गेले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular