
प्रतिनिधी : नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना,युवासेना शाखा क्र. २०१ चे युवाशाखा अधिकारी रोहन सुरेश काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणपती आरती संग्रह २०२४ चे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते माॅंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शिवतीर्थावर करण्यात आले.सदर प्रसंगी सौ.रश्मीताई ठाकरे,शिवसेना नेते श्री दिवाकर रावते,शिवसेना नेते,सचिव, स्थानिक खासदार श्री अनिलभाऊ देसाई,उपनेते,मा.महापौर श्री मिलिंद वैद्य,विभागप्रमुख श्री महेश सावंत,महिला विभाग संघटिका,मा.महापौर सौ.श्रध्दा जाधव, सहनिरीक्षक श्री.सुरेश गणपत काळे,युवाशाखाधिकारी रोहन सुरेश काळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.