मुंबई (रमेश औताडे) : समाजामध्ये आजही वंश आणि रंगाच्या आधारे भेदभाव केला जातो. पाश्चिमात्य देशांमध्ये आजही काळे आणि गोरे यांच्यात भेदभाव केला जातो. आजही गोरे आणि काळ्यांना गोळ्या घालतात. असे अशी खंत ऑल इंडिया कॅम्पिंग ह्युमन डीग्निटी या संघटने चे अध्यक्ष जियायुद्दिन सिद्दीकी यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

काही महिन्यांपासून देशात ठराविक धर्माच्या लोकांच्या घरावर बुलडोझरचा वापर होत आहे. आत्तापर्यंत देशात हजारो घरावर बुलडोझर फिरवला आहे. माणूस आपलं संपूर्ण आयुष्य घर बांधण्यासाठी घालवतो परंतु काही क्षणात तुम्ही त्यांचे घर तोडून टाकता हे योग्य नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. महाराष्ट्रातील बदलापूर याठिकाणी लहान मुलींवर देखील अत्याचार केल्याचे आपण पाहिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाहेदत ए इस्लामी या संस्थेच्या माध्यमातून ५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान मानवता जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी मौलाना अब्दुल रेहमान खुरेशी, हुसेन सय्यद, खालिद खलिद खलिद सिद्धीकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.