
पत्रकारितेतील नवा विश्वास – भिमराव धुळप
भिमराव धुळप… सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेले एक व्यक्तिमत्त्व. साप्ताहिक धगधगती मुंबई चे संपादक ही त्यांची प्रमुख ओळख. आजच्या प्रचंड महागाईच्या जमान्यात वृत्तपत्र चालवणे ही तशी तारेवरची कसरत आहे. परंतू मुंबईमध्ये राहून आपल्या प्रपंचाचा गाडा व्यवस्थितपणे हाकत साप्ताहिक प्रभावीपणे चालवण्याचे शिवधनुष्य त्यांनी लिलया पेलले आहे. याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करावेच लागेल. वृत्तपत्र क्षेत्रातील वाढती स्पर्धा, प्रिटींगचा खर्च, डीटीपी, बातमी मिळवताना करावी लागणारी कसरत, सोशल मिडीयाचा प्रभाव इ. मध्ये साप्ताहिक धगधगतीचा ब्रॅंड निर्माण करण्यात संपादक भिमराव धुळप यशस्वी झाले आहेत.
मुंबई मध्ये आपल्या गावाकडील व्यक्तिंचे कर्तृत्व, सामाजिक कार्ये व उपक्रम व इतर बातम्या प्रामुख्याने ते आपल्या साप्ताहिकात प्रसिध्द करतात. गावाकडच्या लोकांचे कर्तृत्व आपल्या लेखणीच्या माध्यमातून करताना ते अजिबात थकत नाहीत. याचे विशेष वाटते. इतर वर्तमानपत्र, साप्ताहिके बातमी छापताना त्यावर ‘संपादकीय संस्कार’ या गोंडस नावाखाली चांगल्या बातमीला अनेकदा कात्री लावतात. परंतू धगधगती मुंबई याला अपवाद आहे. भागातील लोकांचे कर्तृत्व, समस्या, प्रश्न आपल्या लेखणीतून समाजासमोर आणल्या आहेत.
पत्रकारितेचा व्यवसाय न करता ते प्रबोधनाचे साधन भिमराव धुळप यांनी केले आहे. धगधगती मुंबई साप्ताहिकाचे प्रसारमाध्यम सांभाळत असताना त्यांनी समाजाप्रती असलेली आपली नाळ कधीच तुटू दिलेली नाही. गरीब विद्याथ्र्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार असे उपक्रम त्यांनी सातत्याने राबवलेले आहेत.कर्मभूमी मुंबई असली तरी त्यांचा ओढा आपल्या गावाकडे असतो.
पत्रकारितेतून अनेकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व्यक्तिंना धगधगती मुंबई च्या वर्धापनदिनी यथोचित सन्मानित केले जाते. सदर कार्यक्रमाचे अतिशय संुदरपणे सादरीकरण केले जाते. मोठी वृत्तपत्रे भांडवल, टीम इ.च्या जोरावर कार्यक्रम यशस्वी करतात. परंतू भिमराव धुळप वन मॅन शो असून सुध्दा कार्यक्रम दर्जेदार करतात. पत्रकारिता करुन सामाजिक बांधिलकी जोपासता येते. हे भिमराव धुळप हे उत्तम उदाहरण होय.
नम्र आणि सालस स्वभाव हे धुळपसाहेब यांचे वैशिष्टय आहे. शांतपणे आपले काम करत राहणे असा त्यांचा स्वभाव आहे. प्रतिकुल परिस्थितीत कुटूंबांचा गाडा ओढत त्यांनी आज संपादन केलेले यश अभिमान वाटावा असेच आहे.
धगधगती मुंबई चा दिवाळी अंक सर्वसमावेशक असतो. या मान्यवर साहित्यिकांसोबत नवोदितांच्या साहित्यालाही स्थान दिले जाते. एकंदरित भिमराव धुळप यांनी धगधगती मुंबई या साप्ताहिकाच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेचा, ज्ञानाचा, सामाजिक कार्याचा सुरु ठेवलेला यज्ञ असाच धगधगत रहावो यासाठी ईश्वराने त्यांना निरोगी दिर्गायुरोग्य देवो ही प्रार्थना..!
शेवटी असे म्हणेन….भिमराव धुळप साहेब म्हणजे…..
भि- भि तीला स्थान न देणारे
म- म नमिळावू स्वभाव असलेले
रा- रा त्रंदिवस पत्रकारितेचा विचार करणारे
व- व लयांकित लोकांच्या समवेत असलेले
धु- धु तल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ प्रतिमा असलेले
ळ- काळ आणि वेळ याचा संगम साधणारे
प- प त्रकारितेत नवा विश्वास निर्माण करणारे म्हणजे धुळप साहेब
शब्दांकन: डॉ.संदीप डाकवे