Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रतर अनुसूचित जाती जमाती समूह विखुरला जाईल - अण्णासाहेब कटारे

तर अनुसूचित जाती जमाती समूह विखुरला जाईल – अण्णासाहेब कटारे

मुंबई (रमेश औताडे) : सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती-जमाती मध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती समूहामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे वाद होतील व अनुसूचित जाती जमाती समूह विखुरला जाईल असे मत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

देशातील प्रस्थापित, सत्ताधारी व विरोधी पक्ष मागासवर्गीय मतांवर डोळा ठेवून राजकारण करतात मात्र निर्णयाबाबत ते मूग गिळून बसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीची जनगणना झालेली नाही मग वर्गीकरण कशाच्या आधारावर होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी अण्णासाहेब कटारे यांनी केली.

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे . मुंबईमध्ये पक्षाची ताकत भक्कमपणे उभी करण्यासाठी पक्षाने जुने जाणते रिपब्लिकन नेते अनंत पांचाळ यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास कटारे यांनी अनंत पांचाळ यांच्या निवडी प्रसंगी केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments