Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रकायम असेल तर एक लाखकंत्राटी पद्धतीवर १५ हजार

कायम असेल तर एक लाखकंत्राटी पद्धतीवर १५ हजार

मुंबई (रमेश औताडे) : राज्यातील वीज कमतरता दूर व्हावी म्हणून पॉवर स्टेशन बांधून सरकारचा महानिर्मिती विभाग आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडत असताना, ज्या पॉवर स्टेशन साठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या ते शेतकरी १५ हजारावर महानिर्मिती विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. मात्र महानिर्मिती काही कामगार कायम केले गेले त्यांना एक लाख पगार दिला जात आहे. या दुजभावाच्या वागणुकी विरोधात कंत्राटी कामगारांनी आझाद मैदानात कामगार नेते कृष्णा भोईर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे.

महानिर्मिती विभागाने २५०० कामगारांना कायम करतो म्हणून वेळोवेळी आश्वासन देऊन त्यांचे प्रश्न समस्या प्रलंबित ठेवल्या आहेत. तेच काम, कामाची वेळ तीच मग वेतनात फरक का ? धोरणात्मक निर्णय घेऊन जर सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले तर या कंत्राटी कामगारांना एक लाख पगार मिळेल. रिक्त जागा भरल्या तर दिड हजार लोकांना रोजगार मिळेल असे कृष्ण भोईर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments