धारावी(संजय शिंदे) : धारावी मुख्य रस्त्यावरील ८० वर्षे जुने असलेले कल्याण विलास हॉटेलला बुधवारी (ता. ४) रात्री भीषण आग लागली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरीही आगीत ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी (ता. ३) हॉटेल बंद केल्यानंतर ही घटना घडली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीत हॉटेलमधील फर्निचर, फ्रीज, टेबल व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. धारावी डाक कार्यालयासमोरील फकर मोहम्मद जान मोहम्मद चाळ येथे १९४४ सालापासून असलेले हे हॉटेल धारावीतील सर्वात जुने हॉटेल म्हणून ओळखले जाते.
हॉटेलचे मालक एन. कृष्णन म्हणाले, रात्री १२ च्या सुमारास हॉटेलला आग लागल्याचे समजताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने आग स्वयंपाक घरापर्यंत पोहचू शकली नाही, असे त्यांनी सांगितले. गॅस सिलिंडरला आगीची झळ बसली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती. धारावीतील सर्वात जुने हॉटेल आगीत भस्मसात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
धारावीतील ८० वर्षे जुन्या हॉटेलला आगलाखो रुपयांचे नुकसान
RELATED ARTICLES