मुंबई (रमेश औताडे) : अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यासाठी उच्य न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करावा व त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी. यासाठी सकल मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने आझाद मैदानात ” आयोग दो आंदोलन ” करण्यात आले.
पंजाब सरकार व सर्वोच्य न्यायालय यांच्या न्याय न्याय निवाड्याच्या आधारे महाराष्ट्रात मातंग समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी मोहनराव कांबळे यांनी केली. आरक्षण वर्गिकर्णासाठी अभ्यास समिती स्थापन करा. आरक्षणासाठी कालबध्द कृती कार्यक्रम आखावा. असे बाळाजी घुमाडे यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था तत्काळ कार्यान्वित करावी. आणि ” आर्टी ” संस्थेला दहा हजार कोटी ची तरतूद करावी. अशी मागणी रणधीर कांबळे यांनी यावेळी केली.