Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रटाळगाव,कराड येथे मंगळवारी रात्री अपघात; एक जण जागीच ठार

टाळगाव,कराड येथे मंगळवारी रात्री अपघात; एक जण जागीच ठार


प्रतिनिधी(प्रताप भणगे) : टाळगाव तालुका कराड येथील हद्दीत मंगळवार रात्री आठच्या सुमारास घोगाव कडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी वाहनाचा अपघात झालं. यामध्ये श्रेयस हणमंत कळत्रे वय १९ वर्षे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रेयस हणमंत कळत्रे रा गोटेवाडी हा गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने सवादे येथे काम करत होता. परंतु मंगळवारी रात्री श्रेयस कामावरून घरी आला परंतु काही वेळातच तो घरातून उंडाळे येथे कामानिमित्त त्याची दुचाकी घेवून घराबाहेर पडला होता. तो घोगाव ते टाळगाव दरम्यान टाळगाव हद्दीत तडका हॉटेल जवळ आला असताना रस्त्यावरून वेडसर इसम उंडाळच्या दिशेने चालत जात असताना श्रेयस हा पाठीमागून येत होता गणपतीच्या मंदिरा समोर आला असता रात्रीच्या अंधारात हा वेडसर इसमास काय कळायच्या आत धडक बसली ही धडक इतकी जोराची होती की श्रेयस हा गाडीवरून रस्त्यावर पडला व वेडसर इसमास पायाला मोठी जखम झाल्याने कॉटेज येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. तर श्रेयस याची गाडी त्याच वेळी समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या गाडी क्रमांक MH 02 CL 4979 या गाडीला जोरदार धडकली अल्टो कारच्या उजव्या बाजूस टायर पंक्चर झाला तर टायरच्या समोरील बाजूस असलेले मटगर्ड तुटले आहे यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे सदर अपघाती मृत्यूची नोंद कराड तालुका पोलिस स्टेशनला झाली आहे. कराड तालुका पोलीस प्रशासनाकडून प्रत्यक्ष दर्शीची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. उंडाळे आऊट पोस्टचे पी एस आय जाधव , पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील माने पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments