प्रतिनिधी : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सातारावासियांचे स्नेहसंमेलन व दसरा मेळावा 10 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह ,दादर येथे सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यानिमित्ताने राजकीय, कला, प्रशासकीय, साहित्य, उद्योग, कामगार, कायदा, सहकार, वैद्यकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक अशा क्षेत्रातील किर्तीवंतांचा सातारा रत्न देऊन सत्कार करण्यात येणार आहे.वरील विभागासाठी नामांकन पाठवण्यासाठी amhisatarkar12@gmail.com वर मेल करावा अथवा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान व्दारा बी /१, प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, डॉक्टर कम्पाउंड ,चिंचपोकळी- पूर्व, मुंबई- १२ या पत्यावर प्रत्यक्ष किंवा कुरिअर ने 25 सप्टेंबर पर्यंत पोहचेल असे पाठवावे..
अधिक माहितीसाठी संपर्क . /9967915577/९९८७१९९५६५/०२२ २३७४९६३८
25 सप्टेंबर नंतर आलेल्या नामांकनाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी
वरील नमुन्याप्रमाणे माहिती भरणा करून आवश्यक सांगितल्याप्रमाणे कागदपत्र जोडून वरील मेलआयडी दिल्याप्रमाणे मेल करावी अथवा वरील पत्यावर 25 sept पर्यंत पोहचेल असे कुरिअर करावे किंवा प्रत्यक्ष आणून द्यावे. 15 पानी पेक्षा जास्त पानी फाईल असेल तर प्रत्यक्ष किंवा कुरिअर ने पाठवावी.25 सप्टेंबर नंतर आलेल्या नामांकनाचा विचार केला जाणार नाही.