Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात आंदोलकांनी दिला दिव्यांग व भटक्या समाजाला न्याय…….

साताऱ्यात आंदोलकांनी दिला दिव्यांग व भटक्या समाजाला न्याय…….

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये अनेक आंदोलन होतात. काही आंदोलनाची शासन दरबारी दखल घेतली जात नाही. परंतु ,साताऱ्यात आज प्रथमच आंदोलकांनी दुसऱ्या आंदोलकांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने साताऱ्यात प्रशासकीय दुर्लक्ष झाले तरी लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या आंदोलकांनीच न्याय दिल्यामुळे दिव्यांग व भटक्या समाजाला समाजाच्या अशा पल्लवीत झालेले आहेत.
याबाबत माहितीकारांनी सांगितले की, आज मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कराड तालुक्यातील गोपाळ नगर येथील गोपाळ समाजातील लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी मुख्य रस्त्यावर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनांमध्ये या समाजातील बाळ गोपाळांनी घोषणाबाजी करून बंडखोर सेना प्रणित आदिवासी भटका समाज विकास अभियानाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
या आंदोलनामध्ये युवक प्रदेशाध्यक्ष क्रांतिवीर वायदंडे व भटक्या समाजातील अब्दुल शेख, विशाल जाधव, सौ.रेशमा शेख यांच्यासह सुमारे सव्वाशे गोपाळ समाजातील लोक पोट तिडकीने घोषणाबाजी करत होते .आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडत होते.
या भटक्या समाजाकडे भारतीय नागरिक म्हणून कोणतेही कागदपत्रे पुरावे नाहीत . त्यांना शासकीय योजना चा लाभ मिळत नाही .त्यामुळे न्यायासाठी हा समाज घोषणाबाजी करत टाहो फोडत होता.
याची दखल घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आंदोलक श्री रमेश अनिल उबाळे व युवराज कांबळे, प्रहार संघटनेचे युवा नेते गौरव जाधव यांच्यासह मान्यवरांनी या भटक्या समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
कराड तालुक्यातील कार्वे येथील गोपाळ वस्ती मध्ये राहणाऱ्या या भटक्या समाजासाठी वरिष्ठ नेत्यांनी तातडीने कराडचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्र्यांच्या पाटण तालुक्यातील पापर्डे येथील दिव्यांग बांधव
दीपक निवृत्ती कांबळे यांना सुद्धा दिव्यांगांसाठी असणारी सायकल भेट देऊन आंदोलकांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण केले.
या दोन्ही घटना खरोखरच आगळ्या वेगळ्या ठरल्या आहेत. सातारा शहरात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी दुसऱ्या आंदोलकाला न्याय देण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना ठरली आहे. याची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुरू झालेले आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासकीय कारभार सर्वत्र सुरू आहे .त्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे. असेच चित्र साताऱ्यात पाहण्यास मिळत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असावा. याची आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तरच यापुढे आंदोलकांना न्याय मिळेल असे आता कार्यकर्त्यांनाही मनापासून वाटू लागलेले आहे. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हनुमंतराव चवरे पाटील, पैलवान सागर साळुंखे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ऋषिकेश तथा रावण गायकवाड, नितीन माने संजय शिंदे अजित कांबळे यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments