Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भमनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा होणार असल्याची केली घोषणा

मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा होणार असल्याची केली घोषणा

प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये धुरळा उडवला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहे. बीडमध्ये लवकरच विराट सभा घेतली जाणार आहे.बीडचा श्रीक्षेत्र नगद नारायण गड इथं मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी एक विराट संख्येने एकवटणार आहे. 8 जून रोजी ऐतिहासिक सभा होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये केली आहे. तसंच या सभेच्या नियोजनाच्या तयारीला लागा असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केला आहे.जाहिरातमराठा आरक्षणासाठी सरकारकडे पुन्हा एकदा मागणी करणार आहोत. राज्य सरकारने जे आरक्षण दिलं ते आम्हाला मान्य नाही. आता आरक्षणासाठी राज्यातील सहा कोटी मराठा समाज एकत्रित येणार आहे. त्यामुळे सरकारने हलक्यात घेऊ नये, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आचारसंहिता संपताच काढावा अन्यथा मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावं लागेल, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.जाहिरातआज शुक्रवारी बीडचा श्रीक्षेत नगद नारायण गड इथं सभेच्या अनुषंगाने प्राथमिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत सभेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था रस्ते पाणी आणि व्यासपीठासंदर्भात देखील चर्चा झाली आहे.ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा – मनोज जरांगे पाटीलदरम्यान, यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. 30 एप्रिलपर्यंत या संदर्भात निर्णय घ्या, आढावा बैठका आयोजित करा आणि मला अहवाल द्या असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, आता अहवाल आल्यानंतर मनोज जरांगे पाटील निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा, अशी भूमिका जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीविषयी जाहीर केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments