प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्या वतीने शारदा विद्या मंदिर स्कुलमधील विद्यार्थ्यांकरिता डॉ. राकेश शाह मुलुंड मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वराशी नेत्रालय वाशी यांच्या सहयोगाने निः शुल्क नेत्रविकार तपासणी शिबिर शुक्रवार दि. ३० ऑगष्ट रोजी कोपरखैरणे नवी मुंबई येथे पार पडले. यामध्ये एकूण १०५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
सदर शिबिराचे उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुरेशदादा शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, विष्णु शिंदे सर, विजय संकपाळ तसेच शाळेचे अध्यक्ष रमेश संकपाळ सर व संचालिका सौ दिपाली संकपाळ मॅडम आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
RELATED ARTICLES