Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रनिसर्ग व पर्यावरण संवर्धन साधत महिला सक्षमीकरण करणे गरजेचे- पद्मश्री जनक पल्टा...

निसर्ग व पर्यावरण संवर्धन साधत महिला सक्षमीकरण करणे गरजेचे- पद्मश्री जनक पल्टा मॅगीलिगन यांचे प्रतिपादन

मुंबई (रमेश औताडे) : चहाचा स्टॉल सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरून निसर्ग व पर्यावरण यांचा समतोल साधणाऱ्या तसेच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणाऱ्या तसेच आदिवासी मुलींच्या आरोग्यावर काम करणाऱ्या पद्मश्री श्रीमती जनक पल्टा मॅगीलिगन या बहाई समाज शिकवणीचा प्रसार करून समाजात मानवतेचा संदेश देत आहेत.

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासाठी संधी उपलब्ध करून देणे, आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे हा स्त्री सक्षमीकरणचा उद्देश आहे. तसेच बहाई शिकवणीचा प्रसार करणे हे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेत्या श्रीमती डॉ.जनक पल्टा मॅकगिलिगन यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबई मरीन लाईन्स येथील बहाई समाज हॉल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना त्या म्हणाल्या, माझा जन्म हरियाणा येथील पंजाबी कुटुंबात झाला. मी इंग्रजी साहित्य आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमए) केले. राज्यशास्त्रात एमफिल आणि “आदिवासी आणि ग्रामीण महिलांच्या प्रशिक्षणाद्वारे नवीकरणीय विकास” या विषयात डॉक्टरेट पदवी (पीएचडी) घेतली. मध्यप्रदेश इंदौर जिल्ह्यातील सनावडिया गावात असलेल्या ‘जिमी मॅगिलिगन सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हि संस्था निर्माण केली.

संस्थेने ५०० गावात सौर ऊर्जा संयंत्रे बसवली. कुकर बसवले. आदिवासी मुलींना मार्गदर्शन करण्यात डॉ. मॅकगिलिगन यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे .जेव्हा स्त्री एखाद्या कारणावर विश्वास ठेवते आणि त्या दिशेने कार्य करते तेव्हा तिच्यावर काय परिणाम होऊ शकतो. याचे डॉ. मॅकगिलिगन हे एक उत्तम मूर्तीमंत उदाहरण आहे. डॉ. मॅकगिलिगनच्या नवकल्पनांचा विस्तार सोलर टी स्टॉल्सपर्यंत झाला आहे. संपूर्ण भारतात लाखो चहाचे स्टॉल्स आहेत. चहा बनवण्यासाठी स्वच्छ, शाश्वत सौर ऊर्जेचा वापर केल्याने उद्योगाच्या संधी निर्माण झाल्या आणि वायू प्रदूषण कमी होत आहे.

या संस्थेने ४० हजार विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या या संस्थेत १ लाख ७८ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
डॉ. मॅकगिलिगन हे जैविक सेतूचे सह-संस्थापक आणि सोलर फूड प्रोसेसिंग नेटवर्क इंडियाच्या राष्ट्रीय समन्वयक देखील आहेत.
१९८५ ते २०११ या कालावधीत म्हणजे २६ वर्षात बार्ली ग्रामीण महिला विकास संस्थेच्या संचालक म्हणून काम केले. भारतातील ५०० गावांतील सहा हजार हून अधिक आदिवासी मुली आणि तरुणींना सोलर कुकिंग आणि फूड प्रोसेसिंगचे प्रशिक्षण दिले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments