Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रमहायुती सरकार विरोधातील ‘सरकारला जोडे मारो’ आंदोलनासाठी मुंबई काँग्रेस सज्ज; हुतात्म्यांना अभिवादन...

महायुती सरकार विरोधातील ‘सरकारला जोडे मारो’ आंदोलनासाठी मुंबई काँग्रेस सज्ज; हुतात्म्यांना अभिवादन करून ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत आंदोलन

मुंबई : राज्यातील भाजपा युती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या दिनांक १ सप्टेंबर रोजी हुत्मामा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत ‘सरकारला जोडे मारो’ आंदोलन आयोजित केले आहे. सकाळी १० वाजता या आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या आंदोलनासाठी मुंबई काँग्रेसही सज्ज असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

जोडे मारो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार वर्षा गायकवाड यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या सर्व नेते, पदाधिकारी, सेल व फ्रंटलचे अध्यक्ष व पदाधिकारी, विधानसभा प्रमुख यांच्याशी झूम मीटिंगच्या माध्यमातून चर्चा करून आंदोलनाच्या तयारीची माहिती घेतली व आंदोलनासंदर्भात सुचना केल्या. उद्याचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व भ्रष्ट भाजपा युती सरकारच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त करावा, असे आवाहन प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments