Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्र"मासिक कल्याणयात्रेच्या लेखकांचा राज्यस्तरीय सत्कार सोहळा संपन्न"

“मासिक कल्याणयात्रेच्या लेखकांचा राज्यस्तरीय सत्कार सोहळा संपन्न”

प्रतिनिधी : नशाबंदी मंडळाचे विचार मासिक ‘कल्याण यात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या लेखकांचा राज्यस्तरीय सत्कार सोहळा आज दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. हेमंत देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. दिवाकर शेजवळ, सनदी अधिकारी मा. श्री. समिर वानखेडे, सिंधुदुर्ग जिल्हा अभियंता मा. श्री. अजयकुमार सर्वगोड, अ.नि. स. चे कार्याध्यक्ष मा. श्री. अविनाश पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते मा.श्री. अनिल गलगली तसेच नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास उपस्थित होते. कल्याण यात्रा मासिकाची विशेष थीमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून सदर सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात व्यसनमुक्तीपर गीताने करण्यात आली.

कल्याण यात्रा हे मासिक गेले 66 वर्षापासून व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधन करणे हेतू नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दर महिन्याला प्रकाशित होत असते. या मासिकात लिहिणाऱ्या लेखकांचा सत्कार सोहळा आज पार पडला. या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून लेखक उपस्थित होते ज्यात प्राध्यापक, डॉक्टर, समुपदेशक, वकील, सामाजिक कार्यकर्तेयांचा सहभाग होता. त्यांचा सन्मानचिन्ह व शॉल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नशाबंदी मंडळाच्या कार्यक्रमात सातत्याने सहभाग घेणाऱ्या संस्थांचाही सन्मानचिन्ह व शॉल देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उ‌द्घाटन कल्याण यात्रेच्या विशेष थीमने व ऑगस्ट महिन्याच्या अंकाच्या प्रकाशनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मानचिन्ह व शॉल देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल मडामे यांनी केली व सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केले.

कल्याण यात्रा- व्यसनमुक्तीच्या गाथा या मासिकाचे संपादक अमोल स. भा. मडामे यांचा विशेष सत्कार गेली पंधरा वर्षे यशस्वीरित्या संपादक पद भूषवल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यात योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. हेमंत देसाई व मा. श्री. दिवाकर शेजवळ यांच्या हस्ते शॉल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

सत्कार सोहळ्याप्रसंगी ‘व्यसनमुक्ती वर मासिक चालवणे हे व्यक्ती व समाजास व्यसनमुक्त करण्याचे कार्य आहे जे कार्य नशाबंदी मंडळ सातत्याने करत असून मी मंडळाचे व कल्याण यात्रा या मासिकाचे संपादक अमोल मडामे यांचे विशेष कौतुक करतो असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्ती वर लिहिणाऱ्या लेखकांचा सत्कार सोहळा घेऊन नशाबंदी मंडळाने एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी व्यक्त केले. तर सनदी अधिकारी समीर वानखेडे म्हणाले, एक अधिकारी म्हणून आमच्या मर्यादा आहेत पण समाज जर या लढयात मोठ्या प्रमाणात उतरल्यास ड्रग्स माफियांवर जरब बसेल. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अभियंता अजयकुमार सर्वगोड म्हणाले, नशाबंदी मंडळाचे कार्य हे डोळ्यात अंजन घालणारे आहे, त्यांच्या या कार्यात मी सदैव सहभागी असेल. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, व्यसनांविषयी जनजागृती करण्याचे कार्य कल्याण यात्रा मासिकातून होत आहे याचा विशेष आनंद मला आहे. कल्याण यात्रा मासिकाच्या पुढील वाटचालीस हार्दिक सदिच्छा. आभार प्रदर्शन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समापन झाले.

चौकट

नशाबंदी मंडळ,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व कल्याण यात्रा या मासिकाचे मार्गदर्शक लेखक एकनाथ तांबवेकर यांचा सन्मान आरटीई कार्यकर्ते अनिल गगलगले यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई,दिवाकर शेजवळ,सरचिटणीस वर्षा विद्या विलास,संपादक अमोल मडामे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments