Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रअरुण गवळी (डॅडी ) लवकरच तुरुंगाबाहेर येणार..

अरुण गवळी (डॅडी ) लवकरच तुरुंगाबाहेर येणार..

मुंबई :- कुख्यात गुंड अरुण गवळी संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. अरुण गवळी लवकरच तुरूंगातून कायमचा बाहेर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भाचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आलेत.

दरम्यान, त्याची ही सुटका मुदतपूर्व असून उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही नागपूर खंडपीठाने दिलाय.

२००६ च्या शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण त्यासोबतच इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय ६५ पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल. गवळीचा जन्म १९५५ चा असल्याने त्याचे वय ६९ वर्ष आहे. जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी २००७ पासून तुरुंगात असल्याने गेली सोळा वर्ष तो तुरुंगात आहे. म्हणजेच वर्ष २००६ च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो. त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments