Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु येत्या 3 सप्टेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमी ला भेट देऊन...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु येत्या 3 सप्टेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमी ला भेट देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू येत्या मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 .३० वाजता भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली आहे.

क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मूर्मु यांनी भेट द्यावी अशी विनंती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना केली होती.ना.रामदास आठवले यांच्या विनंतीनुसार राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू यांनी मुंबई भेटीत चैत्यभूमीला भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येत्या मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12.३० वाजता भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणार आहेत.त्यांच्या समवेत यावेळी रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले सुद्धा असणार आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments