Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रछत्रपतींच्या उंच पुतळ्यासाठी राजधानीतील शेतकरी पुत्र प्रयत्नशील…

छत्रपतींच्या उंच पुतळ्यासाठी राजधानीतील शेतकरी पुत्र प्रयत्नशील…

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणजे सातारा असे जगभर नावलौकिक प्राप्त केले आहे. या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सातारचे नाव राजधानी करण्यासाठी शेतकरी पुत्र संजय बाबासाहेब भगत प्रयत्नशील असल्याची माहिती सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली.
जगातील सर्वात उंच रयतेच्या छत्रपतींचा पुतळा सातारा जिल्ह्यात उभारणीसाठी सध्या सर्वच शिवप्रेमी मागणी करत आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्ती स्थान म्हणून विकसित करण्याची परवानगी मिळावी व राजधानी म्हणून सातारची नवी ओळख व्हावी. यासाठी शेतकरी पुत्र श्री भगत प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्ह्यात विशेष ग्रामसभा बोलवून दहा दिवसाच्या आत मध्ये ग्रामसभेत ठराव करून या कार्याला गती द्यावी. अशी त्यांनी विनंती केलेली आहे .याबाबतच्या सर्व कागदपत्राची पूर्तता करण्याची ही जबाबदारी शेतकरी पुत्र श्री संजय भगत यांनी घेतलेली आहे.
रयतेचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्ती स्थान निर्माण करण्यासाठी सरकारचा एक रुपया न घेता रयतेच्या पैशातूनच हे भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे. १९९६ सालापासून पत्रकारिता करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त ही संकल्पना श्री भगत यांच्या मनात रुजली होती. या विषयावर सलग २८ वर्ष मंथन केले आहे. आता हा विषय मांडण्याची गरज व योग्य वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक घटनांबाबत अभ्यासक व जगभरातील शिवप्रेमी प्रयत्नशील आहेत. असे त्यांनी नमूद केलेले आहे. सदरच्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांना पाठवले असून लवकरच जगातील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारण्याचे स्वप्न केव्हा साकार होणार? याकडे आता शिवप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments