Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्र१५०० कोटींच्या निविदा मागवल्यानंतरही मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदारांनी पाठ

१५०० कोटींच्या निविदा मागवल्यानंतरही मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदारांनी पाठ

मुंबई – स्वच्छ व सुंदर मुंबईच्या स्वच्छतेसाठी एकाच कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने १५ फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली. मात्र निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौथ्यांदा निविदा प्रक्रियेला २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.१५०० कोटींच्या निविदा मागवल्यानंतरही मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे.

मुंबईची लोकसंख्या दीड कोटी असून यातील ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत राहतात. या विस्तारित मुंबईचा विकास झपाट्याने होत असला तरी झोपडपट्टीच्या स्वच्छतेकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.पालिकेच्या धोरणानुसार विशेषत: झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी निविदा मागवण्यात आल्या. परंतु निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ११ मार्च रोजी एक आठवड्याची मुदतवाढ दिली. मात्र त्यावेळीही प्रतिसाद न मिळाल्याने १८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र यावेळी कोणीच कंत्राटदार पुढे न आल्याने २५ मार्चपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. त्यांनी तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली आहे. आताही एकही कंत्राटदार आला नसल्याने चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments