सातारा(अजित जगताप) : मौजे आडगाव रंजे ता. वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची तलाठी कार्यालयात निर्गुण हत्या करण्यात आली. या हत्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा सातारा यांच्या वतीने तसेच सातारा जिल्हा महसूल खाते वर्ग -३ कर्मचारी संघटना यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. तसेच संबंधित आरोपीवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. आज महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा सातारा अध्यक्ष चंद्रकांत पारवे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील ६४६ व ४९० तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी सातारचे अपर जिल्हाधिकारी श्री जीवन गलांडे यांना निवेदन दिले. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत शासकीय कार्यालयात हत्येची घटना घडली. ही आरोपीची मानसिक विकृती दिसून येत आहे. या घटनेचा सातारा जिल्हा तलाठी संघ अत्यंत तीव्र संवेदनशील व दुःखद भावना व निषेध व्यक्त करते. वास्तविक… फेरफार प्रलंबित असलेले खून… असे काही वृत्तपत्रात बातमी आलेली आहे. ही पूर्ण चुकीची असून तलाठी वर्गाची बदनामी होत असलेले त्यांच्यावर अन्याय होत आहे. सदर मयत तलाठी संतोष देवराव पवार यांच्या संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे . विकृत आरोपीने निष्पाप तलाठी पवार यांची हत्या केलेली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांची खच्चीकरण झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे .याचा तीव्र निषेध करण्यासाठी गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन पुकारत आहे. या आंदोलनांमध्ये संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे यांच्यासह तलाठी रुपेश शिंदे, अमोल चव्हाण, मंडल अधिकारी विजय पाटणकर, अमोल बोबडे, युवराज गायकवाड, सुहास अभंग हनुमंत नागरवाड, कैलास म्हेसनवाड, मंडल अधिकारी राजश्री चव्हाण अधिकारी संगीता माने, संदीप वनवे यांच्यासह मंडल अधिकारी तलाठी व महसूल कर्मचारी हे सहभागी झाले होते.