बुलढाणा- जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येणाऱ्या किनगाव जटू येथील रहिवासी सचिन जगन नागरे यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील एका उल्लेखनीय क्षेत्रात भुमिका बजावणाऱ्या व्यक्तीला देण्यात येत असतो. यामुळे यंदाचा हा पुरस्कार (२०२३-२४) बुलढाणा जिल्ह्यातुन सचिन नागरे यांना जाहीर झाला आहे. या परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी पुरस्कार निवड मानपत्राव्दारे नुकतेच त्यांना कळवले आहे.
सचिन नागरे यांचे ज्वलंत समस्यांविषयीचे विविध वृत्तपत्रातील पत्रलेखन, स्वच्छता व आदीं विषयीचे चारोळी लेखन ,जनजागृती सामाजिक कार्य, सोशल मीडियावरील जनसंपर्क व आदीं कार्याची विचारपुर्वक दखल घेऊन या पुरस्कारासाठी जिल्ह्यातुन त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा जागृती हा चारोळी संग्रह महाराष्ट्रभर पोहचलेला आहे. विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी विविध कामे केलेली आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे.
सचिन नागरे यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES