Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रशिवरायांची एकदा नव्हे १०० वेळा माफी मागायला तयार; राजकारण करणं हे दुर्दैव...

शिवरायांची एकदा नव्हे १०० वेळा माफी मागायला तयार; राजकारण करणं हे दुर्दैव : मुख्यमंत्री 

प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवभक्तांमध्ये संतापाचा कडेलोट झाला असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. झाललेी घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. 

या सर्व पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकदा नव्हे, तर शंभरवेळा शिवरायांची माफी मागायला तयार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, की शिवरायांची एकदा नवे तर शंभरवेळा माफी मागायला तयार आहे. 

मुख्यमंत्र्यांचा माफीनामा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पुतळा दुर्घटनेबाबत चर्चा झाली. ही खरतर खूप वेदनादायी घटना आहे. नौदलाकडू महाराजांचा पुतळा बनवला आला होता. काल झालेल्या बैठकीला सरकारमधील मंत्री तसेच नेव्हीचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. बैठकीनंतर एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये नेव्हीचे अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरात लवकर ही समिती काम सुरू करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. 
अजित पवारांनी माफी सुद्धा मागितली आहे
शिंदे पुढे म्हणाले की, तेथील वारे, वातावरण आणि एकूण परिस्थीचा आढावा घेऊन महाराजांचा नवीन मजबूत पुतळा उभा करण्यात येणार आहे. विरोधकांनी यावर राजकारण करणे योग्य नाही. कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांच्या पायावर मी एकवेळा नाही, तर हजारवेळा नतमस्तक व्हायला तयार आहे. अजित पवारांनी माफी सुद्धा मागितली आहे. शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. विरोधकांनी सुद्धा यावर राजकारण करू नये. नेव्हीने दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments