मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )
अंधेरी पश्चिम विधानसभा प्रमुख मार्गदर्शक मान.अनिल परब व सरचिटणीस राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शना नुसार महाराष्ट्र रिक्षा चालक सेना सहचिटणीस प्रशांत घोलप,विश्वास तेली व दिनेश उप्पल यांच्या आयोजनात मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा शिबिर पार पडले.शिबिर संजीवनी ममता हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने रविवारी घेण्यात आले.नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा तसेच मोतीबिंदू असलेल्याची मोफत शस्त्रक्रिया शिबिर महाराष्ट्र रिक्षाचालक सेना जनसंपर्क कार्यालय दाऊद बाग,अंधेरी पश्चिम येथे होते. यावेळी उपविभाग प्रमुख हारुन खान, प्रसाद आयरे,उपविभाग संघटिका संजीवनीताई घोसाळकर,शाखा प्रमुख दयानंद कड्डी, शाखासंघटीका सुनंदाताई नांदगावकर, उपविभाग प्रमुख(मालवण) शशिकांत आंगणे, या मान्यवरांनी शिबिराला भेट दिली.तसेच महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे कार्यकर्ते राजेश इंगळे, दीपक मगर, अशोक मगर, रमेश निवाते, कृष्णा ठोंबरे, अर्जुन माईन, संदीप चव्हाण,व रविंद्र कड्डी या सर्वांच्या सहकार्याने सदर शिबिर पार पडले.या शिबिरामध्ये शिवसैनिक पदाधिकारी व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र रिक्षा चालक सेनातर्फे मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा शिबिर अंधेरी येथे संपन्न
RELATED ARTICLES