प्रतिनिधी(प्रताप भणगे) : हिंगोली जिल्ह्यातील कार्यरत तलाठी संतोष देवराव पवार यांच्यावर भ्याड हल्ला करून खून केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक २९ आगस्ट २०२४ रोजी कराड येथील सर्व तलाठी मंडळ अधिकारी,महसूल कर्मचारी, कोतवाल यांनी काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. सदर आंदोलन तलाठी व महसूल कर्मचारी संघटना कराड यांच्या वतीने करण्यात आले होते.याला सर्वच अधिकारी,कर्मचारी आणि कोतवाल यांनी पाठिबा दिला व हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.
