सातारा (अजित जगताप) : सातारा शहर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची चाळण झालेली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम व टक्केवारीमुळे रस्ते सुद्धा टक्के टोणपे खात आहेत. सध्या श्री गणरायाचे आगमन होण्यापूर्वीच सातारा जिल्हा परिषदेसमोरच मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे तातडीने बुजवण्याचे काम सुरू आहे. निदान श्री गणरायाने एवढे तरी विघ्न घालवल्यामुळे भाविक सुखावले आहेत.
सातारा शहरामध्ये सध्या वाढते नागरिकीकरण होत आहे . अनेक जणांना दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनाने प्रवास करावा लागतो. परंतु सर्वच रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यामध्ये पाणी व चिखल साठलेला आहे. हा चिखल व पाणी रस्त्याच्या खड्ड्यात विसावला असल्यामुळे अनेक वाहन चालकांना मणक्याचे विकार सहन करावे लागतात. पण, सातारकर नागरिक शांतपणाने सर्व सहन करून पुन्हा त्याच लोकप्रतिनिधींना निवडून देतो. हे जगातले नवे आश्चर्य ठरलेले आहे. सर्वांचे विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता याची वाट पाहणाऱ्या सातारा शहरातील भाविकांना रस्त्याची डागडुजी होत असल्याने साक्षात श्री गणराया पावला. असेच म्हणावे वाटत आहे. सातारा शहर परिसरात किमान २५ ते ३५ किलोमीटर रस्त्याचे जाळे आहे. काही अपवाद वगळता सर्वच रस्त्याचे अवस्था म्हणजे खड्डेमय रस्ता स्पर्धा लागलेली आहे की काय? असा प्रश्न साताऱ्यात नव्याने आगमन करणाऱ्या वाहनचालकांना पडलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका अशा तीन महत्त्वाच्या विभागामार्फत या रस्त्याचे काम होत असते. या तिन्ही रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याची गुणवंत नियंत्रणामार्फत तपासणी होते. आता या गुणवत्ता नियंत्रकाचे तपासणी करण्याची वेळ आलेली आहे. वास्तविक या रस्त्याबाबत पाहणी करणारे जे अधिकारी आहेत त्याचे उच्च शिक्षणाचे सुद्धा प्रमाणपत्राची तपासणी झाली पाहिजे. असा आता सुरू उमटत आहे.
सध्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचारी कमी व इतरांची वर्दळ वाढत असताना सुद्धा या खड्ड्याकडे कोणी लक्ष देत नाही. काहींची वाहने दिवसभर पार्किंग केलेले असतात. यातच सर्व काही आल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिलेले आहे.
श्री गणरायाच्या आगमनापूर्वीच रस्ता डागडुजीने भाविक सुखावले
RELATED ARTICLES