मुंबई (रमेश औताडे) : भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईत षणमुखानंद हॉल सायन येथे भव्य सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावने आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड आणि सरचिटणिस विवेक पवार यावेळी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
या पदाची हॅट्रीक साधणारे आठवले हे आंबेडकरी चळवळीचे एकमेव नेते ठरले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर त्यांचे अनुयायी म्हणून केंद्रीय मंत्री मंडळात समावेश झालेले रामदास आठवले हे पहिले रिपब्लिकन नेते ठरले आहेत.पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेत हा सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.