Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्रपांचगणी - करहर मुख्य रस्त्यावर बेलोशी जवळील खड्डा देतोय अपघातांना निमंत्रण ;...

पांचगणी – करहर मुख्य रस्त्यावर बेलोशी जवळील खड्डा देतोय अपघातांना निमंत्रण ; अन्यथा आंदोलन : बेलोशी सरपंच उमेश बेलोशे

पांचगणी(रविकांत बेलोसे) : पांचगणी – करहर मुख्य रस्त्यावर बेलोशी गावाजवळ रस्त्याशेजारी असणारा मोठा खड्डा अपघातांना निमंत्रण देत असून मोठ्या अपघाताची वाट सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभाग पाहतेय का असा सवाल बेलोशी ग्रामस्थांबरोबरच वाहनचालकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पांचगणीहून करहरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बेलोशी गावाजवळ रस्त्याला लागूनच पाटबंधारे विभागाच्या लोकांनी महू धरणातील पाणी उचलून दापवडी, बेलोशी , काटवली या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाइन टाकताना मोठा खड्डा व्हॉल्व बसवण्यासाठी खोदला होता तो खड्डा अद्यापही तसाच आहे या खड्ड्यात शेजारील गटरचे पाणी जाऊन तो पूर्णपणे पाण्याने भरला आहे आणि पाण्याने रस्ता हिण्या खड्डायाने खचला असून या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. अचानक किंवा रात्रीच्या वेळी एखादी गाडी अचानक त्यात गेल्यास मोठा अपघात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

या ठिकाणीच शेजारी वीज मंडळाची मोठी डिपी ट्रान्सफॉर्मर असून जर अचानक मोठी गाडी अपघातग्रस्त झाल्यास त्या डी पी वर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा धोका ओळखून तो तातडीने मुजवावा आणि वाहनचालकांना निश्चिंत करावे अशी मागणी या परिसरातील वाहन चालकांनी केली आहे.

प्रतिक्रिया : उमेश बेलोशे –  सरपंच
आम्ही ग्रामस्थांनी या समस्येबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना वारंवार भेटून तक्रार केली परंतु हे अधिकारी आमच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. पण हा खड्डा दीन दिवसात मुजवला नाही तर आम्हाला सर्व वाहनचालकांना तीव्र आंदोलन करावे लागेल याची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments