Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकराड-चांदोली रोडवरील सर्व्हिस रोडवरील पाणी हटवण्याची प्रवाशांची मागणी

कराड-चांदोली रोडवरील सर्व्हिस रोडवरील पाणी हटवण्याची प्रवाशांची मागणी

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : कराड – चांदोली रोड या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या मार्गावरून कोकणात जाणारे चाकरमानी सुद्धा या रस्त्याचा नेहमी वापर करत असतात. याची माहिती सार्वजनिक रस्ते वाहतूक विभागाला असूनही या रस्त्यावर कराड वरून चांदोली कडे जाताना पाचवडेश्वर (पाचवड) येथे वळण घेऊन जावे लागते,मात्र याच रस्त्याच्या कडेला आणि पूर्ण रस्त्यावर पाणी येत असल्याने वाहनधारकांना याचा अंदाज येत नाही. व मोठ्या प्रमाणात गाडीचे नुकसान तर होतेच शिवाय अपघात देखील होत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या बाजूला मोठी नाले बनवली पाहिजेत, त्यामध्ये सदर पाणी जाण्याची व्यवस्थाही केली पाहिजे मात्र असे या मार्गावर कोठेच दिसत नाही. त्यामुळे पाचवड फाटा कराड येथील सर्विस रोडवर पाणी पाणी वाहनधारक यांना पाण्यातून काढावी लागत आहेत. याची रस्ते वाहतूक विभागाने व प्रशासन यांनी  वेळीच दखल देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिक व वाहतूक करणारे प्रवाशी,वाहनधारक करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments