मुंबई (रमेश औताडे) : महाराष्ट्रातील महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणूकीसाठी ” महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशन ” च्या वतीने कायम व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी आझाद मैदानात बुधवारी धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजूर्डे म्हणाले, राज्यशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली. मात्र सरकारने अद्याप काहीच मागण्या मान्य केल्या नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी २०२३ रोजी विधान भवन, मुंबई येथे नगरविकास विभाग व मुख्य सचिव व वित्त विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली मात्र अद्याप काहीही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे सरकारने निवेदनात दिलेल्या ८ मागण्या त्वरित मान्य कराव्या अशी मागणी प्रमुख सरचिटणीस कॉम्रेड गणेश शिंगे यांनी यावेळी सरकारकडे केली.