Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रदेवरुख शहरात शिवसेना (उबाठा) गटाची अधिकृत शाखा उपलब्ध व्हावी अशी निष्ठावंत शिवसैनिकांची...

देवरुख शहरात शिवसेना (उबाठा) गटाची अधिकृत शाखा उपलब्ध व्हावी अशी निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी

कोकण(संदीप गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटातर्फे एक अधिकृत शाखा उपलब्ध व्हावी अशी माफक इच्छा काही निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ते यांची आहे. जेणेकरून या शाखेतर्फे किंवा शाखेतून सर्व सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या, निवेदन किंवा अन्य जनहित असलेली कामे ऐकून घेऊन ती करता येतील.शिवाय शिवसेना (उबाठा)तर्फे विविध कार्यक्रम करणे सोपे होईल.येथील निष्ठावंत शिवसैनिक देवरुख शहरात शाखा व्हावी अशी मागणी करत आहेत.यासाठी उपनेते भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मनावर घेऊन कार्यकर्ते यांच्या भावनांना महत्व देऊन लवकरच विधानसभा निवडूकापूर्वी देवरुख शहरासह गाव तेथे शाखा निर्माण करून कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करावे.जर गावा -गावात शाखा निर्माण झाल्या तर पक्ष पण वाढेल आणि जनतेची कामे पण करता येतील. तालुका प्रमुख बंडया बोरुकर यांनी तालुकाच्या वतीने सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके यांच्याकडे लेखी पत्र देऊन निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मागणीचा विचार करावा.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन देवरुखसह गावा -गावात शाखा मान्य करून शिवसेना कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी तालुका प्रमुख यांनी विशेष प्रयत्न केले तर शिवसेना पक्ष बळ घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडूकमध्ये त्याचा चांगलाच फायदा होईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments