प्रतिनिधी : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) व धगधगती मुंबई वृत्तपत्र आयोजित दहीकाला उत्सवास शिवसेना नेते,दिवाकर रावते यांनी उपस्थित राहून अमर सुभाष गोविंदा पथकांनी सात थर लावून ही दहीहंडी फोडली सन्मानचिन्ह,रोख रक्कम,कंब्रिजचा शर्ट दिला,यावेळी शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे,आयोजक उपविभागप्रमुख यशवंत विचले, सौ सायली यशवंत विचले,पत्रकार,समाजसेवक भिमराव धुळप,माजी शाखाप्रमुख सिद्धार्थ चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.या उत्सवातील उर्वरित रक्कम गोर गरीब रुग्णाच्या वैधकीय मदतीसाठी दिली जाणार आहे. दादरमध्ये ही दहीहंडी बांधण्यात आली होती,रुग्णाच्या मदतीसाठी दहीहंडी असल्याने शेकडो गोविंदा पथकाने येथे येऊन सहभाग नोंदवला. यापैकी घोषित केल्याप्रमाणे व गोविंदा पथकाचा वाढता प्रतिसाद पाहता ४० गोविंद पथकांनी पाच थर आणि सहा थर लावून सलामी दिली,त्या प्रत्येक गोविंदा पथकांना सन्मानचिन्ह,५०१ आणि १००१ व कॅब्रिज चा शर्ट सप्रेम भेट देण्यात आले.शेवटी अमर सुभाष गोविंदा पथकांनी सात थर लावून दहीहंडी फोडली त्यांना देखील रोख रक्कम म्हणून ५५५५/- रुपये सन्मानचिन्ह,कॅब्रिज शर्ट सप्रेम भेट देण्यात आले. उर्वरित रक्कमेतील रक्कम ही गरीब रुग्णाच्या वैद्यकीय मदतीसाठी देण्यात येणार आहे.यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला भेटी देऊन रुग्णाच्या मदतीच्या संकल्पनेचे कौतुक करून सामाजिक उपक्रम राबवून एक चांगला संदेश आपण इतर आयोजकांना दिला असल्याची प्रतिक्रिया दिल्या.
रुग्णाच्या मदतीसाठी दहीहंडी उपक्रमामुळे अनेकांची कौतुकाची थाप; अमर सुभाष गोविंदा पथकांनी सात थर लावून फोडली हंडी
RELATED ARTICLES