सातारा (अजित जगताप) सातारा दि: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखालील सरकारी, निम- सरकारी, शिक्षक, इतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी गुरुवार दि: 29 ऑगस्ट रोजी बेमुदत संप पुकारला आहे . या संपामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार शासकीय कर्मचारी सहभागी होतील. अशी माहिती जिल्हा समन्वय समिती निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सातारा शाखा अध्यक्ष नेताजी दिसले यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळेला संघटनेचे ह. भ. प. मारुती जाधव ,काका पाटील व विविध सरकारी कार्यालयातील कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य सरकारने आश्वासन दिलेल्या सर्व मागणी या सप्टेंबर २०२४ च्या मध्यापर्यंत मंजूर झाल्यास पाहिजे. या आग्रहासाठी हा बेमुदत संप आहे. यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एक मार्च २०२४ च्या प्रभावाने प्रस्तुत करण्यात यावी. सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद व शिक्षण वर्गातील शिक्षक कर्मचारी यांना ते लागू व्हावे. निवृत्तीवेतन समाविष्ट करावे. सेवानिवृत्ती मर्यादा केंद्राप्रमाणे वाढविण्यात यावी. निवृत्तीवेतन अंश राशीकरण पुनर स्थापना कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्यात यावा. नियोजन पद भरती बद्दल उठवा .गट ड कर्मचाऱ्यांच्या पाल्यास वारस हक्काने सरकारी नियुक्ती द्या. सेवा ज्येष्ठता वय ६० वर्षे करा. कालबद्ध पद्धतीने बेमुदत संप आंदोलन होत आहे. मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे व निमंत्रक विश्वास काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा व पंचायत समिती आणि नगरपालिका हद्दीमध्ये हे आंदोलन होणार असल्याची यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाशी निगडित असलेल्या नर्सेस, आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सेवा विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करा. आदिवासी दक्षता भागातील कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व्यतिरिक्त एक स्तर वेतन वाढीचा लाभ द्या. शिक्षण सेवक , ग्रामसेवक यांना मिळणाऱ्या बंधनात महागाईच्या आधारे वाढ करावी. अशा प्रकारच्या या मागण्या आहेत. हा मोर्चा लोकशाही मार्गाने शांततेत काढण्यात येणार आहे. आपल्या न्याय हक्कासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन मोर्चा यशस्वी करावा असे सातारा शाखा अध्यक्ष श्री दिसले यांनी विनंती केलेली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या दि:२९ ऑगस्ट बेमुदत संपाची साताऱ्यात जोरदार तयारी
RELATED ARTICLES