Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनूतन राष्ट्रवादी खासदार नितीन पाटील यांना मिळाला सातारी पेढा तुलाचा मान….

नूतन राष्ट्रवादी खासदार नितीन पाटील यांना मिळाला सातारी पेढा तुलाचा मान….



सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य तथा नूतन खासदार श्री नितीन लक्ष्मणराव जाधव -पाटील यांच्या आज साताऱ्याचा कंदी पेढे तुला करून त्यांना सातारकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मुंबई येथून सातारा जिल्ह्यात नूतन खासदार नितीन जाधव पाटील यांचे सातारा भूमीत आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी व फुलांचा वर्ष तसेच गुलालची उधळण करत

नितीन पाटील मित्र परिवाराने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. एक नेता एक आवाज खासदार नितीन पाटील… खासदार नितीन पाटील असा जयघोष करण्यात आला सातारा जिल्ह्यातील खंडाळा व वाई तालुका तसेच महाबळेश्वर येथील अनेक मातब्बर मंडळी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. सातारा तालुक्यातील अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले विशेष बाब म्हणजे खासदार नितीन पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात महामार्गावरती अगदी जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच त्यांच्या हितचिंतकांकडून कंदी पेढ्याचा तुला करून त्यांचा मानसन्मान राखण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार मकरंद पाटील यांच्यासह खासदार नितीन पाटील यांच्याशी कनिष्ठ संबंध असलेले युवा नेते संजय लाड , राजू कुलकर्णी, राजेंद्र आंधळकर, अनिल शिंदे ,प्रदीप शिंदे, बाबासो घोरपडे, प्रमोद परमणे , हेमंत सावंत, प्रमोद सावंत, सुधाकर शितोळे, सईद इनामदार, संकेत परमणे, यांनी कंदीपेढ्याने तुला केल्याने पाटील बंधू भारावन गेले होते. या सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील खटाव मान कोरेगाव फलटण वाई महाबळेश्वर खंडाळा सातारा जावळी पाटण कराड या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पाटील कुटुंबियांच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी अल्पोहार ठेवण्यात आला होता. अनेक कार्यकर्ते बॉम्बे रेस्टॉरंट येथील रिपब्लिकन पक्ष एक गटाच्या कार्यालयात थांबून नूतन खासदार नितीन पाटील यांची वाट पाहत होते त्यांचाही चहा पाण्याचा कार्यक्रम रिपोर्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला या वेळेला रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी किरण ओव्हाळ विजय ओवाळ व योगेश माने यांनीही नूतन खासदार नितीन पाटील यांचे मनापासून अभिनंदन करून स्वागत केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments