प्रतिनिधी : रा. फ.नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोपरखैरणे येथे, कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री औदुंबर पाटील साहेब यांनी,”पोलीस अधिकारी येती भेटीला!” या उपक्रम अंतर्गत पालक,शिक्षक यांच्या सोबत,मुक्त सवांद साधून सायबर क्राईम,महिला सुरक्षा,सजग पालकत्व,पोलीस विभाग यांचे विविध उपक्रम,पोक्सा कायदा या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या वतीने,पोलीस चॅनल ऑन व्हॉट्स ॲप सुरू केले असून,सदर लिंक डाऊनलोड करून,पोलिसांनी खास जनतेसाठी,महिला आणि सायबर गुन्हे घडू नयेत,या साठी ११२ ,१९३० आणि ८८२८११२११२ हे फोन क्रमांक कार्यान्वित केले असून संपर्क करून,गुन्हेगार यांना वेळीच अटकाव करण्यासाठी सहकार्य करावे,ही विनंती केली.
जवळपास अडीचशे पालक,शिक्षक यांना संबोधित करताना श्री औदुंबर पाटील साहेब यांनी सांगितले की,”आम्ही कार्यक्षेत्र न बघता काम करत आहोत,फोन आल्यावर पाच मिनीटे पेक्षा कसे कमी वेळात तिथे पोहचत आहोत, गुन्हेगारास कडक कायद्यांचे कलम लाऊन कठोर शिक्षा देवून वचक बसवता येतो,हे नमूद करून,आपण आपल्या मुलांसोबत बोलते व्हा,हसते खेळते व्हा,जेणेकरून तो एक निर्भिड,सजग नागरिक म्हणून समाजात वावरू शकेल,नकारात्मक गोष्टींपासून सावध रहा,अन्याय सहन करू नका आणि एक पाऊल आजचे उद्यासाठी यशाची पाऊलवाट असेल,असे प्रतिपादन केले.
पालक सभेस वरिष्ठ अधिकारी श्री संजय जाधव साहेब यांनी ,श्री औदुंबर पाटील साहेब यांनी, कोपरखैरणे विभागातील काही समाजकंटक यांचा कसा बंदोबस्त केला,हे सांगितले.मुख्याध्यापक श्री रवींद्र पाटील यांनी,”जो आपल्या टीमला लीड करतो,जो पहिला वार आपल्या हातावर घेतो,आणि जो सामान्य नागरिकास आपण भारतीय नागरिकांच्या वेशातील पोलीस आहोत,असा आत्मविश्वास जागवतो,त्या रिल् नव्हें तर रिअल हिरो,असणाऱ्या पोलीस अधिकारी यांचे नाव,श्री.औदुंबर पाटील साहेब आहे,असे नमूद करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमास श्री.संतोष आव्हाड सर,सौ रश्मी चांदे मॅडम,इतर पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ सुजाता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन सौ. चारुशीला चौधरी,उपमुख्याध्यापिका यांनी केले.
“पोलिस अधिकारी आपल्या भेटीला” उपक्रमात श्री. औदुंबर पाटील साहेब यांनी साधला शेकडो पालकांशी संवाद!”
RELATED ARTICLES