मुंबई ( रमेश औताडे) : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबई प्रादेशिक काँग्रेस, मध्य प्रदेश आणि चंदीगड काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रदेशाध्यक्ष आणि समन्वयकांच्या नावांना मंजुरी दिली आहे. नंदेश पिंगळे हे मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे नवे अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत सोनू शहा, विनय पांडे, ऍड. प्रीतमकुमार गोवर्धन आणि धर्मेश सोनी मुंबई काँग्रेसच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.
काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली, त्यांनी सांगितले की, नितेंद्र सिंह राठौर यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अब्बास हाफिज, चंचलेश व्यास, अभिनव बरोलिया, असद उद्दीन आणि अपूर्व भारद्वाज यांना राज्य सोशल मीडियाचे राज्य समन्वयक पदी नियुकी करण्यात आली आहे.