मुंबई (रमेश औताडे) : मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांची प्रलंबित ५०० कोटींची बिले मिळावी म्हणून ” मुंबई कॉन्टॅक्टर्स असोसिएशन ” च्या वतीने सोमवार पासून आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे. सरकारने आमची बिले लवकरात लवकर मिळावी असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष दादा इंगळे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात येणाऱ्या ४ विभागात इलाखा शहर विभाग, मध्य मुंबई विभाग वरळी, एकात्मिक घटक विभाग, जे. जे. हॉस्पिटल, उत्तर मुंबई विभाग, अंधेरी या चारही विभागात काम करणाऱ्या ४०० कंत्राटदारांची ५०० कोटींची बिलं प्रलंबित आहेत. हि बिले २२१६ व २०५९ या हेड अंतर्गत १४ महिन्यांपासून मिळणे बाकी आहे.असे अध्यक्ष मुकुंद काकड यांनी सांगितले.
गणपती उत्सवा अगोदर तातडीने आमचे ५०० कोटीची बिले देण्यात यावी असे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रविंद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अतिरीक्त मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर या सर्वांनी तातडीने लक्ष घालून प्रथम प्राधान्याने द्यावीत जेने करून गणपती सण आनंदाने साजरा करता येईल असे दादा इंगळे म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष विजय कदम, सचिव यश गौतम, प्रशांत पासलकर, दशरथ बोर्डवेकर व संचालक मंडळ समन्वय समिती व कंत्राटदार उपस्थित होते.