Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरजलदुर्ग सिंधूदुर्गा शेजारी जंजिरे राजकोट वर उभारलेला शककर्ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला…..!!!

जलदुर्ग सिंधूदुर्गा शेजारी जंजिरे राजकोट वर उभारलेला शककर्ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला…..!!!

प्रतिनिधी : गडपती शिवरायांनी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षानंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांचा चिराचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत. पण आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवला गेलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षभराच्या आतच धाराशाही झालेला आहे.
हा पुतळा बसवला त्याचवेळी माझ्यासारख्या अभ्यासकाने या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि याच्या मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही. याबद्दलही त्यावेळेला आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलेलो होतो. पण याकडे सबंधितानी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर 3-4 फेब्रुवारी 2024 ला मी या पुतळ्याला भेटी दिली होती. आणि त्यावेळीही हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही. हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते.

खरंतर नौदलासारख्या प्राख्यात आस्थापनेने केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे; इतकं ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होत. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील, ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल.तर त्याच्या मजबूती कडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही?

शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झालं.
आज संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचं शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीन दोस्त झालेलं पाहून भारताची – भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल! याचा आपण विचार करावा. आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेत असताना शिवाजी महाराजांचे भले उंच पुतळे तयार करून आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही शिवप्रेमीनी विचार करावा. हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे यांच्या हेतू विषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का ?

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments