Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रदेवरूखमध्ये शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती...

देवरूखमध्ये शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध

कोकण (शांताराम गुडेकर ) : मा.उच्च न्यायालयाचा आदर ठेवून शरद पवार,उद्धव ठाकरे,नाना पटोले व महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी महाराष्ट्र बंद चा निर्णय मागे घेतला.महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी बदलापूर घटना अतिशय निंदनीय व संतापजनक असल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून आज(दि.२४ ऑगस्ट ) बदलापूर घटनेचा निषेध केला.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्याशेठ बोरुकर, माजी उपसभापती अजित गवाणकर, शहरप्रमुख दादा शिंदे, मुन्ना थरवळ, युवासेना उप तालुकाप्रमुख तेजस भाटकर, सचिन शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश भुवड, संदेश जाधव, शाखाप्रमुख विनोद माने, मुबीन पटेल, संतोष शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments