सातारा (अजित जगताप) : सातारा लोकसभा मतदार संघासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत राहून प्रचार करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते व सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी द्यावी यासाठी कार्यकारिणीने ठराव केला. पण, सोशल इंजिनिअरिंगच्या वापर करून ही उमेदवारी दुसऱ्याला दिली तरी नाराजी अथवा बंड न करता वंचितशी निष्ठा दाखवून मीच उमेदवार आहे. असे समजून काम करण्याची भूमिका सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी घेतली आहे. या भूमिकेचे सर्वच पक्षीय नेत्यांनी मनापासून स्वागत केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार म्हणून श्री बाळकृष्ण देसाई यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच कार्यरत राहून वंचितचे विचार सातारा जिल्ह्यात पोहोचवले आहे .विशेषता इतर मागासवर्गीय समाजामध्ये फुले- शाहू- आंबेडकरांचे विचार पोहचवण्याचे काम त्यांनी मनापासून केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्याला अनेक राजकीय पक्षाने खुली ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली.
माझा राजकीय प्रवास हा वंचितच राहील. कारण, आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाला न्याय मिळावा ही भूमिका घेतली आहे. हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबबत उमेदवारी मिळाली नाही हा प्रश्नच येत नाही. पक्ष वाढवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्याहीपेक्षा नेत्याच्या आदेशाचे पालन करणे. हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काम आहे. भविष्यात सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील निष्ठावंत बाबत कोणी उल्लेख केला तर बाळकृष्ण देसाई यांचे नाव घ्यावेच लागेल असे त्यांनी ठासून सांगितले.
आगामी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन वंचितचे अधिकृत उमेदवार मारुती जानकर यांच्यासाठी शक्ती प्रदर्शन करावे. बाळकृष्ण देसाई यांचे मुळगाव तारुख ता. कराड हे आहे.
वंचितने डावलले तरी त्यांचाच प्रचार करण्याचा सातारा जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेचे सर्वत्र होतेय कौतुक….
RELATED ARTICLES